Nana Patole On BJP: राज्यात भाजप पक्षाचा काउंटडाऊन सुरू; काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वक्तव्य
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने जबरदस्त कामगिरी केली आहे. यावर कॉंग्रेस नेते पटोले यांनी वक्तव्य केले आहे की, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारीची काउंटडाऊन सुरु झाली आहे.
Nana Patole On BJP: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने जबरदस्त कामगिरी केली आहे. यावर कॉंग्रेस नेते पटोले यांनी वक्तव्य केले आहे की, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारीची काउंटडाऊन सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्य असं आहे की, ते भाजपला सत्तेवरून बेदखल करेल. असे हुकूमशाही सरकार देशात येऊ नये यासाठी महाराष्ट्रातील जनता सर्वतोपरी प्रयत्न करेल असे पटोले म्हणाले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्रात केवळ एक जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसने यावेळी 13 जागा जिंकल्या. तर शिवसेनेला (युबीटी) नऊ आणि आरसीपी (शरद पवार) यांना आठ जागा मिळाल्या, भाजप आणि मित्र पक्षांना केवळ 17 जागा मिळू शकल्या.( हेही वाचा- लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर नितीन गडकरींच्या नातवंडांनी घेतली लाडक्या आजोबाची भेट;
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)