Pune: डेक्कन क्वीनच्या डब्यांतून निघाला धूर, गाडी थांबवून दुरुस्ती केल्याने दुर्घटना टळली
ठाकूरवाडी स्थानकानजीक ही घटना घडली.
पुणे-मुंबई (Pune - Mumbai) डेक्कन क्वीन (Deccan Queen) एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांत सकाळी धूर येऊ लागला. तातडीने गाडी थांबवून दुरुस्ती करण्यात आल्याने दुर्घटना टळली. ठाकूरवाडी स्थानकानजीक ही घटना घडली. पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी पुण्यातून मुंबईकडे रवाना झाली. लोणावळ्यात थांबा घेतल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)