Pune News: ससून रुग्णालयात लिफ्ट अडकल्याची घटना, अग्निशमन दलाच्या मदतीनं सहा जण सुखरुप बाहेर

पुण्यातील ससून रुग्णालयातील नवव्या इमारतीमध्ये पाचव्य आणि चौथ्या मजल्यावर लिफ्ट अडकल्याची घटना समोर आली आहे.

sasun Hospital

Pune News:  पुण्यातील ससून रुग्णालयातील नवव्या इमारतीमध्ये पाचव्या आणि चौथ्या मजल्यावर लिफ्ट अडकल्याची घटना समोर आली आहे. सुमारे तासभर ही लिफ्ट अडकली होती. लिफ्टमध्ये एकूण सहा जण होते. त्यापैकी एकजण महिला होती. घटनेची माहिती अग्निशमन दलात देण्यात आली, तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या मदतीने अडकलेल्या सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान रुग्णालयात या घटनेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. अग्निशमन दलाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या अथक प्रयत्नानंतर सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement