Silofar Panchamrit Kalash: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाच्या राष्ट्रपतींना भेट दिला कोल्हापूरचा पंचामृत कलश; जाणून घ्या काय आहे खास

हा कलश कोल्हापूरच्या पारंपारिक कारागिरीचे अप्रतिम उदाहरण आहे. हा सिलोफर पंचामृत कलश उच्च-गुणवत्तेच्या चांदीपासून बनविला गेला असून, जो अतिशय कौशल्याने साकारला आहे.

PM Narendra Modi gifted Silofar Panchamrit Kalash to Nigeria's President Bola Ahmed Tinubu. (Photo credits: X/@ANI and ANI)

Silofar Panchamrit Kalash: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारी संध्याकाळी नायजेरियाहून ब्राझीलला रवाना झाले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाच्या राष्ट्रपतींना कोल्हापूरचा सिलोफर पंचामृत कलश भेट म्हणून दिला. हा कलश कोल्हापूरच्या पारंपारिक कारागिरीचे अप्रतिम उदाहरण आहे. हा सिलोफर पंचामृत कलश उच्च-गुणवत्तेच्या चांदीपासून बनविला गेला असून, त्याच्यावरची बारीक नक्षीकाम आणि सुबक घडणावळ हे कारागिराच्या हातची कसब दाखवतो. यावर कोल्हापूरच्या प्रसिद्ध धातूकामाचे वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम केले असून, ज्यात मुख्यत्वे फुलांचे नमुने, देवता आणि कोल्हापूरच्या पारंपरिक रचनांचा समावेश आहे. पंचामृत- दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे पवित्र मिश्रण, देण्यासाठी कलशाचे हँडल आणि झाकण वापरण्यास सुलभ असे तयार केले आहे. (हेही वाचा: PM Narendra Modi Special Gifts For Jill and Joe Biden: चांदीची ट्रेन, पश्मिना शाल; पंतप्रधान मोदींनी जिल आणि जो बिडेन यांना दिले खास गिफ्ट)

Silofar Panchamrit Kalash: