Shocking: सोशल मिडिया इंफ्लुएंसर Aanvi Kamdar चा मृत्यू; रायगडमधील धबधब्यावर इंस्टाग्राम रीलचे शूटिंग करत असताना पडली दरीत

घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तिच्यापर्यंत पोहोचली व तिला जखमी अवस्थेमध्ये माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

AanviKamdar

Travel Influencer Aanvi Kamdar Dies: यंदाच्या पावसाळ्यात विविध अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. आता इंस्टाग्रामवर आपल्या ट्रॅव्हल पोस्ट्समुळे चर्चेत असलेली अन्वी कामदार हिच्या मृत्यूची बातमी समोर येत आहे. मुंबईजवळील रायगडमध्ये अन्वीचा मृत्यू झाला. अन्वीला प्रवासाची आवड होती व या आवडीला तिला आपले करिअर बनवले होते. आज रायगडमधील कुंभे धबधब्याचे सौंदर्य कॅमेऱ्यात टिपत असताना अन्वीचा अपघात व त्यात तिचा मृत्यू झाला. अन्वी धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या सुळक्यावरती जाऊन रील शूट करत होती. त्याचवेळी व्हिडीओ काढण्याच्या नादात तिचा पाय निसटला व ती थेट 350 फूट खोल दरीमध्ये पडली. या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तिच्यापर्यंत पोहोचली व तिला जखमी अवस्थेमध्ये माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अन्वी कामदारचे इंस्टाग्रामवर दोन लाख 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. अन्वीने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळ डेलॉइट नावाच्या कंपनीत कामही केले होते. मुंबईत राहणारी अन्वी कामदार पावसाळ्यात कुंभे धबधब्याच्या शूटिंगसाठी आली होती. (हेही वाचा: Boy Drowns In Rainwater Filled Pit: पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; Uttan येथील धक्कादायक घटना)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now