खानदेशचा रील स्टार विकी पाटील चा बापाकडून खून; आत्महत्या करत नंतर संपवलं आयुष्य

विकीची ओळख खान्देशचा रील स्टार म्हणून होती. तो काही अहिराणी गाण्यांमध्येही दिसला होता. सोशल मीडीयात विकी पत्नी सोबत व्हिडिओ टाकत होता.

खानदेशचा रील स्टार विकी पाटील चा बापाकडून खून; आत्महत्या करत नंतर संपवलं आयुष्य
Dead Body | Pixabay.com

जळगाव मध्ये धरणगाव-एरंडोल तालुक्यात एका बापाने आपल्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणामध्ये पुरून स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुसाईड नोट मध्ये या घटनेची त्यांनी माहिती दिली आहे. मृत मुलगा 22 वर्षीय रील स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील आहे. त्याच्या वडीलांचे नाव विठ्ठल सखाराम पाटील आहे. विठ्ठल पाटील माजी सैनिक होते. त्यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवले आहे.

विठ्ठल पाटील यांनी सुसाईड नोट मध्ये 'आपण मुलाचा खून केला असून मृतदेह धरणात पुरला आहे.' असं म्हटलं आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट सापडल्यानंतर तपास सुरू केला आणि धरणातून विकीचा मृतदेह बाहेर काढला.

भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला आहे. जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह बाहेर काढला. विठ्ठल पाटील यांनी मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या का केली? याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.Mumbai nightlife

 

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2025 09:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).