Sanjay Nirupam यांच्या घणाघातीला टीकेला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर; 'संजय निरूपम यांनी निवडणूक लढवायची इच्छा पक्षाला सांगावी सोशल मीडीया ला नव्हे' (Watch Video)

संजय निरूपम 2014, 2019 मध्ये पराभूत झाले आहेत. आता त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी बोलावं सोशल मिडीयात बोलून उपयोग नसल्याचं म्हणत ठाकरे गटाने निरूपमांचे कान टोचले आहेत.

Sanjay Nirupam | Twitter

उद्धव ठाकरे यांनी काल अमोल कीर्तीकर यांना खासदारकीची  उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेस कडून संजय निरूपम आक्रमक झाले आहेत. जागावाटपाचा तिढा सुटण्याआधीच उमेदवार जाहीर करणं हा गटबंधनाचा धर्म तोडल्यासारख्या असल्याचं म्हणत त्यांनी ठाकरे गटावर घणाघाती टीका केली आहे. याला आनंद दुबे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 2019 ला आम्ही जिंकलेल्या जागेवरच आम्ही उमेदवार जाहीर केला आहे. अमोल कीर्तीकर कोणत्याही घोटाळ्यात अद्याप दोषी आढळलेले नाहीत त्यामुळे त्यांचा अपप्रचार करू नका तसेच संजय निरूपम 2014, 2019 मध्ये पराभूत झाले आहेत. आता त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी बोलावं सोशल मिडीयात बोलून उपयोग नसल्याचं म्हणत ठाकरे गटाने निरूपमांचे कान टोचले आहेत.

पहा आनंद दुबे यांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement