ट्रान्सजेंडर लोकांसाठी शिंदे सरकारचा दिलासा; राशन कार्ड अर्जावर मिळणार विशेष सवलत
महाराष्ट्र सरकारने आता नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करताना, ट्रान्सजेंडर व्यक्तींना निवासी पुरावा आणि ओळख पुराव्यासाठी सूट देण्याचा प्रस्ताव जारी केला आहे.
महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने ट्रान्सजेंडर लोकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने आता नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करताना, ट्रान्सजेंडर व्यक्तींना निवासी पुरावा आणि ओळख पुराव्यासाठी सूट देण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, आता ट्रान्सजेंडर लोकांची नावे राज्य एड्स नियंत्रण समितीकडे नोंदणीकृत असल्यास किंवा त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र असल्यास (ज्यामध्ये ते ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून ओळखले गेले असतील), अशा लोकांच्या अर्जाचा विचार केला जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)