Shikshan Sevak Salary Hike: शिक्षण सेवकांसाठी खुशखबर! मानधनामध्ये भरघोस वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

इतकी मोठी वाढ आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षण सेवकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला. प्राथमिक शिक्षकांना 15 हजार रुपये, माध्यमिक शिक्षकांना 18 हजार आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना 20 हजार रुपये असे मानधन करण्यात येणार आहे. इतकी मोठी वाढ आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी होत होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)