IPL Auction 2025 Live

Sheena Bora Murder Case: शीना बोरा हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा गायब; हाडे व अवशेष सापडत नसल्याची सीबीआयची माहिती

शीना बोराच्या हत्येचा खटला सुरू असताना सीबीआयला हाडे व अवशेष दाखवून साक्षीदाराचे जबाब घ्यायचे होते, मात्र त्यांना अवशेष सापडत नाहीत.

Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Sheena Bora Murder Case: देशातील चर्चित शीना बोरा हत्या प्रकरणात पुन्हा एकदा नाट्यमय ट्विस्ट आला आहे. हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडातील एक महत्त्वपूर्ण पुरावा बेपत्ता झाला आहे. तपासणीवेळी 2012 साली सापडलेले शीना बोराचे अवशेष आणि हाडे आता सरकारी पक्षाला सापडत नाहीत. सरकारी बाजूने न्यायालयाला सांगितले की, 2012 मध्ये जेव्हा शीना बोराची कथित हत्या करण्यात आली होती, तेव्हा पेण पोलिसांनी कथितपणे तिची हाडे आणि अवशेष जप्त केले होते, परंतु आता त्याचा ठावठिकाणा माहित नाही. मुंबईतील भायखळा भागातील सरकारी जेजे रुग्णालयातील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉक्टरच्या साक्षीदरम्यान, सीबीआयने हा धक्कादायक खुलासा केला.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार जेजे रुग्णालयाच्या फॉरेन्सिक डॉक्टरांनी त्या हाडांची तपासणी केली होती. 2012 मध्ये ज्या ठिकाणी शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, तिथून पेन पोलिसांनी हे अवशेष जप्त केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी हे अवशेष माणसाचे असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र, आता शीना बोराच्या हत्येचा खटला सुरू असताना सीबीआयला हाडे व अवशेष दाखवून साक्षीदाराचे जबाब घ्यायचे होते, मात्र त्यांना अवशेष सापडत नाहीत. अवशेष न मिळाल्याने आतापर्यंत तीन वेळा सुनावणी तहकूब करण्यात आली असून, आता पुढील सुनावणी 27 जून रोजी होणार आहे. (हेही वाचा: Accident Caught on Camera: पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव कारने दिली महिलेला धडक; हवेत फेकली गेली पिडीता, पहा धक्कादायक व्हिडिओ)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)