भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीशी केली शेअर; Maharashtra ATS कडून एका आरोपीला अटक
आरोपी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या एजंटच्या संपर्कात होता.
भारत सरकारची गोपनीय माहिती पाकिस्तानी एजन्सीशी शेअर केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसने एका आरोपीला अटक केली आहे. नेव्हल डॉकमध्ये (सिव्हिल अप्रेंटिस) काम करणाऱ्या गौरव पाटील (23) या तरुणाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या एजंटच्या संपर्कात होता. याप्रकरणी एटीएसने एकूण 4 जणांवर गुन्हा दाखल केला असून, उर्वरित 3 संशयित गौरव पाटीलच्या संपर्कात होते. एटीएसने याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा: Action Against Eateries In Mumbai: मुंबईमधील 239 रेस्टॉरंट्सवर FDA ची कारवाई; आढळले गलिच्छ स्वयंपाकघर, शिळे अन्न, कालबाह्य गोष्टी, मुंग्या आणि झुरळे)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)