प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, लता मंगेशकर यांच्याकडून शरद पवार यांची विचारपूर; पवारांनी ट्विट करत मानले आभार
शरद पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरून मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, लता मंगेशकर यांचे आपल्या प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल आभार मानले आहेत.
शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी (Breach Candy Hospital ) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर मुख्यंमत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, लता मंगेशकर यांच्याकडून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या सोशल मीडियावरून यासर्वांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! @OfficeofUT@CMOMaharashtra
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
Received a phone call from Shri @drharshvardhan ji to check about my health. Appreciate him checking on my health and well-being.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
शरद पवार यांनी लता मंगेशकर यांचे विशेष आभार मानले -
माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे.@mangeshkarlata
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2021 01:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

