Watch: ‘राज्यात राष्ट्रपती राजवट का व कोणाच्या सांगण्यावरून लागली याचा खुलासा शरद पवार यांनी करावा’- Devendra Fadnavis

शरद पवार यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नाचा एक फायदा म्हणजे 2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट संपली.

Devendra Fadnavis | (Photo Credits: PTI)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता, असे फडणवीस म्हणाले होते. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नाचा एक फायदा म्हणजे 2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट संपली.

पहाटेचा शपथविधी झाला नसता, तर महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट हटली नसती आणि महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट हटवली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'शरद पवारांनी काही खुलासा केला हे चांगले आहे. आता माझी त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की, राष्ट्रपती राजवट का लागली? कोणाच्या सांगण्यावरून लागली? याबाबतचा खुलासाही शरद पवार यांनी करावा.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)