Sharad Pawar Death Threat Case: शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल

शरद पवार यांना 'तुझा नरेंद्र दाभोलकर' केला जाईल अशा आशया सह जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sharad Pawar | Twitter

एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांना ट्वीटर वर जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी आज सुप्रिया सुळेंनी एनसीपी शिष्टमंडळासह मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यानंतर पोलिसांनीही कारवाई करत कलम 153A, 504, 506(2)अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये क्राईम ब्रांच देखील तपास करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. Sharad Pawar On Death Threat: धमकी देऊन आवाज बंद होईल हा गैरसमज, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबादारी राज्य सरकारची- शरद पवार 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)