Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना Currency Note Press Nashik कडून खास गिफ्ट (Watch Video)

करन्सी नोट प्रेस नाशिक कडून शरद पवार यांना खास गिफ्ट देण्यात आले आहे.

Sharad Pawar Birthday | X @PTI

शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. आज त्यांना Currency Note Press Nashik कडून खास गिफ्ट देण्यात आलं आहे. 85 या आकड्यावर नाण्यांची सजावट करण्यात आली आहे. शरद पवार यांनीही त्यांची भेट स्वीकारली आहे. देशातील पहिली चलनी नोट 1924 मध्ये नाशिकमध्ये बनवण्यात आली होती. भारतीय चलनाच्या बाबतीत नाशिकला महत्त्व आहे. हे कारखाने चालवण्यासाठी शरद पवारांनी आम्हाला पाठिंबा दिल्याने आम्ही या निमित्ताने दिल्लीत आलो आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना नेहमीच अनोख्या भेटवस्तू देत आलो आहोत. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या भेटीबद्दल करन्सी नोट प्रेस नाशिकचे जगदीश गोडसे म्हणाले आहेत. Sharad Pawar 85th Birthday: शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानी पोहचले अजित पवार, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ.  

शरद पवार यांना करन्सी नोट प्रेस नाशिक कडून खास गिफ्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement