Sexual Relationship Out Of Love: 'लैंगिक संबंध प्रेमाचे होते, वासनेचे नव्हते’; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाला जामीन मंजूर

अहवालानुसार, 23 ऑगस्ट 2020 रोजी मुलगी आरोपीसोबत स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून गेली होती. तपासात दोघे बेंगळुरू येथे सापडले. त्यानंतर तरुणाला 30 ऑगस्ट 2020 रोजी अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो कोठडीत होता.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या एका व्यक्तीला जामीन मंजूर केला. या दोघांमधील कथित लैंगिक संबंध हे वासनेचे नसून त्यात प्रेमाची भावना दिसत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, एकल न्यायाधीश न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांनी सांगितले की, या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन असली तरी तिने स्वतःहून तिच्या पालकांचे घर सोडले आहे. तिच्या पोलीस स्टेटमेंटमध्ये, मुलीने आरोपी व्यक्तीसोबत तिचे ‘प्रेमसंबंध’ असल्याची कबुलीही दिली होती. कोर्टाने पुढे ही वस्तुस्थिती लक्षात घेतली की, ती अर्जदार (आरोपी) सोबत विविध ठिकाणी राहिली आणि तिला जबरदस्तीने नेण्यात आले अशी कोणतीही तक्रार तिने केलेली नाही. खंडपीठाने म्हटले की, प्रेमामुळेच ती अर्जदाराशी (आरोपी) जोडली गेली. त्यामुळे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार झाले असे म्हणता येणार नाही.

अहवालानुसार, 23 ऑगस्ट 2020 रोजी मुलगी आरोपीसोबत स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून गेली होती. तपासात दोघे बेंगळुरू येथे सापडले. त्यानंतर तरुणाला 30 ऑगस्ट 2020 रोजी अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो कोठडीत होता. (हेही वाचा: Porn Addiction in Gen Z: उच्च न्यायालयाने व्यक्त केली किशोरवयीन मुलांमधील पॉर्न व्यसनाबद्दल चिंता; समुपदेशनाची गरज असल्याचे निरीक्षण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now