SET Exam 2021: महाराष्ट्रात सेट परीक्षा 26 सप्टेंबरला
SET Exam 2021: महाराष्ट्रात सेट परीक्षा 26 सप्टेंबरला
वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदावर काम करण्यासाठी अनिवार्य असलेली राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट येत्या २६ सप्टेंबरला होणार आहे. परीक्षेसाठी १७ मे ते १० जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकंदर १५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेविषयीची अधिक माहिती setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांनी काल सांगितले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)