10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून जास्त गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाख रुपयांचे अनुदान- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही योजना बार्टीमार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना, व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख याप्रमाणे एकूण 2 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही योजना बार्टीमार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. योजनेमधील लाभार्थी संख्येवर कोणतीही मर्यादा असणार नाही.