10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीमधील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना, व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख याप्रमाणे एकूण 2 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही योजना बार्टीमार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. योजनेमधील लाभार्थी संख्येवर कोणतीही मर्यादा असणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही योजना बार्टीमार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. योजनेमधील लाभार्थी संख्येवर कोणतीही मर्यादा असणार नाही- मंत्री @dhananjay_munde
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)