Sanjay Raut On NCP: महाराष्ट्रातील राजकीय नाट्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केली 'लोकशाही' ची नवी उपरोधिक व्याख्या

लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. अशी मूळ लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांनी दिली होती.

NCP | Twitter

महाराष्ट्रात 2019 पासून सुरू झालेल्या सत्तानाट्याचे एकापाठोपाठ नवे आणि धक्कादायक अंक सुरू आहेत. वर्षभरापूर्वी शिवसेना आणि आता एनसीपी पक्षामध्ये फूट पडली आहे. सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी या दोन्ही पक्षातील काही आमदार भाजपाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या मनात आता राजकारणाचा पुरता चिखल झाल्याची भावना झाली आहे. अशामध्ये संजय राऊत यांनी एनसीपी आमदारांचा फोटो ट्वीट करत लोकशाही ची नवी उपरोधिक व्याख्या लिहली आहे. संजय राऊतांनी ट्वीट मध्ये लोकशाही : "अब्राहम लिंकन कृत व्याख्या:- नेत्यांनी नेत्यांच्या हिताकरिता नेत्यांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही!" असं लिहलं आहे. नक्की वाचा: Maharashtra Political Crisis 2023: ....तर मला राजकारणात राहायचं नाही, अमोल कोल्हे देणार खासदारकी पदाचा राजीनामा .

पहा संजय राऊत ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement