'एकनाथ शिंदे 'मातोश्री' वर परत चला' चा फलक घेऊन गुवाहाटी मध्ये पोहचला सातार्‍याचा शिवसैनिक; पोलिसांनी घेतलं ताब्यात

सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 पेक्षा जास्त शिवसेना आमदार आणि अपक्ष आमदार गुवाहाटी मध्ये आहेत.

एकनाथ शिंदे 'मातोश्री' वर परत चला चा फलक घेऊन गुवाहाटी मध्ये  सातार्‍याचा शिवसैनिक पोहचला आहे. संजय भोसले असं या शिवसैनिकाचं नाव असून तो सातार्‍यात उपजिल्हाप्रमुख आहे. शिवसेनेने आमदारांना खूप काही दिलं आहे. आमदारांनी माघारी फिरावं असं आवाहन त्याने केले आहे. दरम्यान हॉटेल बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असल्याने त्याला आसाम पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई नियमानुसार केल्याचं म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement