Sanitation Worker's Death In Kandivali: मॅनहोल सफाई कर्मचार्‍याच्या डोक्यावरून गेली चारचाकी, उपचारादरम्यान मृत्यू; कंत्राटदार, कार चालकाला अटक

जखमी अवस्थेमध्ये सफाई कर्मचार्‍याला रूग्णालयात दाखल केले होते मात्र काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Sanitation Worker's Death In Kandivali: मॅनहोल सफाई कर्मचार्‍याच्या डोक्यावरून गेली चारचाकी, उपचारादरम्यान मृत्यू; कंत्राटदार, कार चालकाला अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कांदिवलीच्या डहाणूकरवाडी परिसरामध्ये मॅनहोलच्या सफाईचं काम करणार्‍या कर्मचार्‍याच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी आता कारवाई करत कार चालक आणि कंत्राटदाराला अटक केली आहे. सफाई कर्मचार्‍यांच्या अंगावरून चारचाकी गाडी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. 11 जूनच्या या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिस स्टेशन मध्ये आयपीसी 304 (A), 336 आणि 279 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जखमी अवस्थेमध्ये सफाई कर्मचार्‍याला रूग्णालयात दाखल केले होते मात्र काल त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. Building Collapsed in Ramabai Ambedkar Colony: घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर कॉलनी मध्ये इमारतीचा भाग कोसळला; चारही जखमींची प्रकृती स्थिर .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2023 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).