Pune: पुण्यातील अनधिकृत पब, हॉटेल्सच्या हप्त्यासंदर्भात सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांकडून एक्साईजची पोलखोल; काय आहे प्रकरण? वाचा
रवींद्र धंगेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.
Pune: आज काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारेंनी पुण्यातील अनधिकृत पब, हॉटेल्सवर कारवाई सुरू असतानाच आज एक्साईज कार्यालयात अधिकाऱ्यांसमोरच पोलखोल केली. रवींद्र धंगेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धंगेकर यांनी म्हटलं आहे की, ' पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढा वाचला. पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या अजून पर्यंत शुल्काचे सुपरटेंडंट घरण सिंग राजपूत यांना साधारण महिन्याचे प्रत्येक हॉटेल मधून पैशाचे पाकीट पुरवले जाते ती लिस्ट खालीलप्रमाणे,
विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, भुगांव भुकुम, बाणेर, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवड, लोणावळा आदी. भागातील कलेक्शन करणारे कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे तसेच खाजगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवी पुजारी, तानाजी पाटील, माऊनी शिंदे, राजु इ. व काही लायसन्स धारक जसे राहुल रामनाथ, सुन्नी सिंह होरा, बाळासाहेब राऊत पण वसुली करतात.
• विमाननगर परिसरातील लेट नाईट व रुफ टॉपवाले..
१.द माफिया १ लाख
२. एजंट जॅक्स प्रत्येक outlet ५० हजार total १० -१२ outlet
३. बॉलेर २ लाख महिना
४. 2 bhk lakh. (राजाबहादूर मिल्स)
५. दिमोरा १ lakh (राजाबहादूर मिल्स)
६. मिलर १ लाख (राजाबहादूर मिल्स)
७. TTF rooftop ५० हजार (बाणेर)
८. बँक स्टेज ९० हजार (Vimanngr. & Moh. Wadi)
९. ठीखणा १.५ लाख ३ outlet चे
१०. स्काय स्टोरी ५० हजार
११. जिमी दा ढाबा ५० हजार ( पाषाण)
१२. टोनी दा ढाबा ५० हजार
१३. आयरीश ४० हजार
१४. टल्ली टुन्स - ५० हजार
१५. ऍटमोस्ट फेयर ६० हजार
१६. रुड लॉज ६० हजार
१७. द टिप्सी हॉर्स ६० हजार
१८.रेन फ़ॉरेस्ट रेस्टो बार ५० हजार
१९. 24K-बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड - १.५ लाख
२०. कॅफे सीओ 2 (cafe CO2) हॉटेल भूकंम १ लाख महिना
२१.कोको रिको हॉटेल भूगाव ७५०००/- महिना
२२. स्मोकी बिच हॉटेल भुकुंम ७५०००/- महिना
२३.सरोवर हॉटेल भूगाव १ लाख महिना
२४.जिप्सी हॉटेल भुकुंम ५०००० महिना
२५. ७ : साईबा हॉटेल ३००००/-
या सह वाईन्स शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे १८ हॉटेल बार, २ वाईन्स शॉप, ३ बिअर शॉपी व इतर ढाबे (होलसेल लिकर) ३.५ लाख रुपये.
२६. बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे ६६ बार, ३० वाईन्स शॉप, ३५ बिअर शॉपी ५.५ लाख (होलसेल लिकर)
२७. कैलास जगताप व इतर यांचे ११ बार, ८ वाईन्स शॉप, ९ बिअर शॉपी २.५ लाख (होलसेल लिकर)
२८. कोरेगाव पार्क व कल्याणीनगर, बालेवाडी हायस्ट्रीट, कोंढवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, या भागातील सर्वच लेट नाईट चालणारे पब, रुफटॉप रेस्टॉरंटला प्रत्येकी कमीत कमी ५० हजार महिन्याला (प्रत्येकी)
२९. वाईन्स शॉपचा माल ठेवणारे परमिट रुमला कमीत कमी महिन्याला – २० (प्रत्येकी)
३०.रेस्टॉरंट व ढाबेच्या ठिकाणी अवैध दारू विक्रीसाठी - महिन्याला कमीत कमी २५ ते ५० (प्रत्येकी)
३१. शाम जगवानी व इतर यांचे ११ वाईन्स शॉप मधून होलसेल दारू विक्री व ऑनलाईन होम डिलेव्हरी करिता महिन्याला २.५ लाख.
३२.एक्साइज division १२ - प्रत्येक ५० हजार - ६ लाख रूपये.
३३. दारु चे होलेसेलर ३२ - ५० हजार प्रत्येकी महिना.
३४. साखर कारखाने १८ ते २० कारखाने -५० हजार महिना
३५.नवीन परमिटरूमबार - १२ (ग्रामीण)
३६.नवीन परमिटबार -१२ ते १५ (महानगर पालिका)
३७. बिअर शॉपी (ग्रामीण)- ३
३८. बिअर शॉपी (शहर)- ५
स्वतः एजेंट म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतो, आणि सर्व काम कॉन्स्टेबल सागर धुर्वे व तात्या शिंदे हे दोन व्यक्ती फूड लायसन्ससह सर्व परवाने काढतात. ही माहिती त्रातस्त एक्साईजच्या स्टाफनी दिलेली आहे. ७८ लाख रूपये महिना कलेक्शन असून २ वर्षात नवीन लायसेन्स केलं त्याचे २.५ कोटी रुपये. अशाप्रकारे लाखो रुपयांचा हप्ता पोलीस प्रशासन या पब आणि बार मालकांकडून गोळा करत आहेत. हे सगळे प्रकरण अत्यंत गंभीर असून पुण्याच्या पोलीस प्रशासनाला लागलेली कीड व पुण्याच्या संस्कृतीचा मांडलेला खेळ अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे.
पहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)