Ram Mandir Inauguration: प्रकाश आंबेडकरांना मिळाले अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण, राहणार अनुपस्थित, म्हणाले- 'हा धार्मिक कार्यक्रम एक राजकीय मोहीम'
मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, कारण हा कार्यक्रम भाजप-आरएसएसने मंजूर केला आहे.'
प्रकाश आंबेडकरांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ते या सोहळ्यासाठी अनुपस्थित राहणार आहेत. त्यांनी सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मला मिळाले. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, कारण हा कार्यक्रम भाजप-आरएसएसने मंजूर केला आहे आणि हा धार्मिक कार्यक्रम निवडणूक फायद्यासाठी राजकीय मोहीम बनला आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘माझे आजोबा डॉ.बी.आर. आंबेडकरांनी इशारा दिला होता की, जर पक्षांनी देशापेक्षा धर्म वर ठेवला तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे गमावले जाईल. माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे. देशापेक्षा धर्म मोठा समजणाऱ्या भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे. जय फुले. जय सावित्री. जय शाहू. जय भीम.’ (हेही वाचा: Ram Temple Pran Pratishtha Ceremony: राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी; अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल, जाणून घ्या सविस्तर)