Rajya Sabha Election 2022: एमआयएमची दोन मते कोणाला? अखेर सस्पेन्स संपला, खासदार इम्तियाज जलील यांनी केली घोषणा

त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असलेले राजकीय, वैचारिक मतभेद कायम राहतील."

Imtiaz Jalil | (PC - Facebook)

आज राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणूकापुर्वी एमआयएमने मोठी घोषणा केली आहे. ओवेसी यांचा पक्ष आता महाविकास आघाडी (MVA) उमेदवाराला मतदान करणार आहे. आपल्या ट्विटमध्ये इम्तियाज जलील यांनी म्हटलं, "भाजपचा पराभव करायचा आहे. त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत असलेले राजकीय, वैचारिक मतभेद कायम राहतील."

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)