Raj Thackeray Meets His Young Fan: दुर्धर आजाराशी झुंजणाऱ्या लहानग्या फॅन 'राज देशपांडे' च्या भेटीला जेव्हा पोहचले राज ठाकरे (Watch Video)

मनसे अध्यक्षांनी राज देशपांडे च्या कुर्त्यावर मेसेज लिहित स्वाक्षरी करून त्याला खूश केले आहे.

Raj With Raj | Twitter

पुण्याच्या दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज दापोडी मध्ये त्यांच्या एका रिक्षा चालक कार्यकर्त्याच्या मुलाची भेटीची इच्छा पूर्ण केली आहे. राज देशपांडे असं या चिमुकल्याचं नाव आहे. राज देशपांडे सध्या 'मस्क्युलर डायस्ट्रॉपी' या आजाराने ग्रस्त आहे. आपल्या फॅनला भेटायला येताना  मनसे अध्यक्षांनी भेटवस्तू आणल्या होत्या. तर राज देशपांडेनेही त्यांना पेन भेट दिलं. त्याच्या आग्रहास्तव मनसे अध्यक्षांनी राजच्या कुर्त्यावर मेसेज लिहित स्वाक्षरी दिली. या भावनिक भेटीनंतर राजच्या उपचारांसाठी डॉक्टरांसोबत भेट देखील घालून देणार असल्याचं तो म्हणाला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement