Raj Mungase Gets Interim Protection: शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध रॅप सॉंग बनवणार्या Raj Mungase ला अटकेपासून सत्र न्यायालयाने दिला तात्पुरता दिलासा
राजचे गाणं सरकारचे, आमदारांचे अवमान करणारे असल्याचं सांगत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध रॅप सॉंग बनवणार्या Raj Mungase ला अटकेपासून सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. राज हा मूळचा छत्रपती संभाजी नगरचा आहे. काही दिवसांपूर्वी त्याने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या परिस्थितीच्या आधारे शिंदे-फडणवीस सरकार वर एक गाणं बनवलं आहे. त्याच्यावरून राजवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या कुटुंबाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, 6 एप्रिल पासून राज बेपत्ता आहे आणि त्यासाठी पोलिसांत तक्रार देखील घेतली जात नाही.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)