Rahul Gandhi On EVMs in India: 'भारतात EVMs जणू 'Black Box'; कोणालाही छाननी ची परवानगी नाही, मुंबई मधील Ravindra Waikar यांच्या प्रकारणावरून राहुल गांधी पुन्हा गरजले!

EVMs जणू 'Black Box'आहेत कुणालाच छाननीची परवानगी नसल्याचं मत राहुल गांधींनी मांडलं आहे.

रविंद्र वायकर विरूद्ध अमोल कीर्तीकर या लढतीमध्ये लोकसभेच्या निवडणूकीत फेरमतमोजणी करताना कीर्तीकरांचा 48 मतांनी पराभव झाला आहे. दरम्यान याप्रकरणात आता मतमोजणी केंद्रावर वायकरांचा नातेवाईक मोबाईल फोन घेऊन पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत भारतात EVMs जणू 'Black Box'आहेत कुणालाच छाननीची परवानगी नसल्याचं मत राहुल गांधींनी मांडलं आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसते तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते. असं ते म्हणाले. North West Mumbai Lok Sabha Result 2024: अमोल कीर्तीकरांकडून मतमोजणी केंद्रावरील EVM मध्ये छेडछाड केल्याची तक्रार दाखल; कोर्टातही मागणार दाद .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now