Pune Water Shortage: पुण्यात भीषण पाणी टंचाई; जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत मतदान न करण्याचा नागरिकांचा निर्धार (Watch)

पालिकेकडून पुणेकरांना टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्माण झालेल्या या पाणीटंचाईमुळे नागरिक राजकीय नेत्यांवर संताप व्यक्त करत आहेत.

Water | representative pic- (photo credit -pixabay)

No Water No Vote: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये तीव्र उष्णतेचा इशारा जारी केला आहे. देशात यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. अशात आता बेंगळूरूनंतर पुण्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पालिकेकडून पुणेकरांना टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निर्माण झालेल्या या पाणीटंचाईमुळे नागरिक राजकीय नेत्यांवर संताप व्यक्त करत आहेत. शिवाजी नगर येथील खैरेवाडी परिसरात पुणेकरांनी 'नो वॉटर नो व्होट'चे बॅनर लावले आहे. परिसरातील अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत रहिवाशांनी आंदोलनही केले. खैरेवाडी भागातील स्थानिक रहिवासी आयुष बोबडे सांगतात, 'गेल्या 18 महिन्यांपासून या भागात पाणीटंचाई आहे, आम्हाला दिवसातून दोनदा मिळणारे पाणी प्रदूषित होते आणि लोक आजारी पडले आहेत. आम्ही ठरवले आहे की जोपर्यंत आमच्या नळाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही.' (हेही वाचा: Mumbai-Pune Expressway: उन्हाचा पारा वाढला! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुढचे तीन दिवस अवजड वाहनांना बंदी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)