Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष्य द्या! देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे 17 ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहरात पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित परिसर
या गुरुवारी, 17 ऑक्टोबर रोजी शहराला पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी, शुक्रवारी बहुतांश भागात विलंबाने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
Pune Water Cut: पुण्यातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांमधील देखभाल आणि विद्युत कामांमुळे, या गुरुवारी, 17 ऑक्टोबर रोजी शहराला पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी, शुक्रवारी बहुतांश भागात विलंबाने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नियोजित कामांमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांमध्ये वडगाव धायरी, वारजे, पुणे कॅन्टोन्मेंट, एसएनडीटी आणि पर्वती परिसरातील युनिट्सचा समावेश आहे. पुणे महानगरपालिका (पीएमसी) जल विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी या परिस्थितीबाबत निवेदन जारी केले.
पेठ परिसर, कोथरूड, कोरेगाव पार्क, खराडी, शिवाजीनगर, स्वारगेट, बिबवेवाडी, बीटी कवडे रोड, फुरसुंगी, हडपसर, सोलापूर रोड आणि पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटसह शहरातील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज, कर्वे रोड, हिमाली सोसायटी, पाषाण, भूगाव, बावधन, भुसारी कॉलनी, सुस रोड आदी भागांनाही पाणीकपातीचा फटका बसणार आहे. तरी नागरिकांनी गुरुवारी आणि शुक्रवारी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहनही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (हेही वाचा; New Mahabaleshwar: नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध; ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स, टॉय ट्रेन्स, केबल सिस्टिमसह अनेक बाबींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर)
देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पुण्यात 17 ऑक्टोबर रोजी पाणी कपात-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)