Pune Shocker: अवजड लोखंडी गेट अंगावर पडल्याने साडेतीन वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू; इमारत मालकावर कारवाईची मागणी (Watch Video)
या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस तपासात उघड झाले की, इमारत मालक आणि रहिवासी दोघांनाही ते गेट खराब असल्याची माहिती होती, तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
Pune Shocker: पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी घराबाहेर खेळत असताना, अवजड लोखंडी गेट अंगावर पडून साडेतीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिशय दुःखद अशा या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार मुले त्यांच्या घराबाहेर खेळताना दिसत आहेत. काही क्षणांनंतर, त्यातील एक लहान मुलगा घराचे गेट बंद करायला जातो, त्याचवेळी ते गेट तिथून जाणाऱ्या 3.5 वर्षांच्या मुलीच्या अंगावर पडते. इतके जड, मोठे लोखंडी गेट अंगावर पडल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला आहे. गिरिजा गणेश शिंदे असे मृत मुलीचे नाव आहे.
बोपखेल, पिंपरी चिंचवड, पुणे जवळील कॉलनी क्रमांक 2, गणेशनगर येथे ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस तपासात उघड झाले की, इमारत मालक आणि रहिवासी दोघांनाही ते गेट खराब असल्याची माहिती होती, तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून इमारत मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. (हेही वाचा: Mumbai Road Accidents: मुंबईत यंदा जानेवारी ते जुलै दरम्यान रस्ते अपघातात 164 जणांचा मृत्यू; वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीत समोर आली माहिती)
या व्हिडिओमधील दृश्ये विचलित करू शकतात-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)