Pune Shocker: पुण्यातील लवळे-नांदे रोडवर कुटुंबावर 40 जणांचा हल्ला; रॉड, काठ्या, दगड घेऊन केला पाठलाग (Watch Video)
कसातरी जीव वाचवून ते तिथून निसटले. त्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Pune Shocker: महाराष्ट्रातील पुण्यामधून एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एका कारमधील कुटुंबावर 30-40 लोकांनी हल्ला केल्याचे दिसत आहे. या लोकांपासून आपला जीव वाचवत कुटुंब मध्यरात्री रस्त्यावर आपल्या कारमधून अतिशय वेगाने जाताना दिसत आहे. ही घटना 29 सप्टेंबरची आहे. सुसगाव येथील तहिवासी पीडित अभियंता रवी कर्नानी यांनी दावा केला आहे की, लवळे-नांदे रस्त्यावर प्रवास करत असताना काही लोकांनी त्याच्या कुटुंबावर हल्ला केला आणि काही अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोक ठिकठिकाणी हत्यारांनी पीडितेच्या गाडीवर हल्ला करत आहेत. गाडीत बसलेली महिला व्यथित अवस्थेत देवाचे नाव घेताना ऐकू येते.
स्थानिक मीडियानुसार, कर्नानी म्हणाले की, या भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांनीही त्यांना मदत केली नाही. कसातरी जीव वाचवून ते तिथून निसटले. त्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाठलाग करणाऱ्या वाहनाची नंबर प्लेट बघून स्थानिक लोकांनीच हा हल्ला केला असण्याची शक्यता कर्नानी यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा: Pune Police Attack: कुख्यात गुंड्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस निरिक्षकांवर कोयत्याने हल्ला, आरोपी फरार)
पुण्यात कुटुंबावर 40 जणांचा हल्ला-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)