Pune: पुण्यातील हेल्मेट सक्तीचा नियम घेतला मागे; जनतेच्या रोषानंतर प्रशासनाचा निर्णय
पुणेकरांच्या टीकेनंतर प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला आहे
आज बातमी आली होती की, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकी चालवताना 4 वर्षांवरील प्रत्येकाला हेल्मेट घालणे बंधनकारक केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबाबत जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली होती. आता पुणेकरांच्या टीकेनंतर प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला आहे. जिल्हाधिकार्यांनी हेल्मेट सक्ती मागे घेत लोकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केले असून, प्रशासन लोकांना या समस्येबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करेल असे सांगितले. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दुचाकीवरून ये-जा करताना हेल्मेट वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. मोटार वाहन कायद्यातील सुधारणांनुसार चार वर्षांवरील व्यक्तीने हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)