Pune Porsche Car Crash: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करू; CM Eknath Shinde यांचे आश्वासन

अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात बेकायदेशीरपणे ठेवले जात असल्याचा आरोप करत त्याच्या आत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आज सुनावली पार पडली.

CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Pune Porsche Car Crash: पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश आज त्यांना सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आज कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करू असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पालकांना आश्वस्त केले.

अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात बेकायदेशीरपणे ठेवले जात असल्याचा आरोप करत त्याच्या आत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आज सुनावली पार पडली. या प्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली होती. तसेच जो अपघात झाला तो संवेदनशील असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र याचा परिणाम अल्पवयीन आरोपीवरही झाला आहे. मानसशास्त्रज्ञांसोबत अल्पवयीन मुलांचे सत्र सुरू ठेवावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. (हेही वाचा: NEET Paper Leak Case: लातूर येथील शिक्षकास 6 दिवसांची पोलीस कोठडी, नीट परीक्षा पेपर लीक प्रकरण)

पहा पोस्ट- 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement