Pune Porsche Car Crash: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर; Bombay High Court चा मोठा निर्णय

या अपघातामध्ये दोन तरुण आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता.

Pune Porsche Car Crash

Pune Porsche Car Crash: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला सुधारगृहातून सोडण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचा आदेश आहे की, अल्पवयीन आरोपीला त्याच्या आत्याकडे राहावे लागेल. या प्रसिद्ध खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आरोपीच्या सुटकेचा आदेश दिला. या प्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण टिपण्णी केली होती. तसेच जो अपघात झाला तो संवेदनशील असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र याचा परिणाम अल्पवयीन आरोपीवरही झाला आहे.

मानसशास्त्रज्ञांसोबत अल्पवयीन मुलांचे सत्र सुरू ठेवावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात बेकायदेशीरपणे ठेवले जात असल्याचा आरोप करत त्याच्या आत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, पुणे शहरात 19 मे रोजी अल्पवयीन मुलाने त्याच्या वेगवान पोर्श कारने दोन तरुणांना धडक दिली होती. या अपघातामध्ये दोन तरुण आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा: Online Share Trading Fraud: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा प्रकरणात मुंबई सायबर पोलीसांकडून प्रमुख संशयितांना अटक; तब्बल 1.17 कोटी रुपयांची फसवणूक)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)