Pune Metro Timing: मेट्रोच्या वेळापत्रकात बदल; सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत धावणार मेट्रो

वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते दिवाणी न्यायालय या दोन्ही मार्गांवर पुणे मेट्रो सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत धावणार आहे.

Pune Metro | Twitter

पुणे मेट्रोच्या वेळेत आता बदल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी मेट्रो प्रवास करत प्रवाशांच्या सूचना जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार आता सकाळी मेट्रो 7 ऐवजी 6 वाजल्यापासून धावणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत असेल. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते दिवाणी न्यायालय या दोन्ही मार्गांवर पुणे मेट्रोची प्रवासी बदलण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement