Pune Car Accident Case: अल्पवयीन आरोपीविरुद्ध एक प्रौढ म्हणून खटला चालवण्यासाठी प्रयत्न करणार; सीपी अमितेश कुमार यांची माहिती
जिथे न्यायालयाने काही अटींसह तरुणाला जामीन मंजूर केला होता.
Pune Car Accident Case: पुण्यातील कल्याणी नगर येथे पोर्शे कार अपघाताचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे एका अल्पवयीन व्यक्तीने भरधाव वेगाने पोर्श कार चालवत एका मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कार चालवणाऱ्या 17 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले, पुढे त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने काही अटींसह तरुणाला जामीन मंजूर केला होता. आता या अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना आज अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पुणे सीपी अमितेश कुमार यांनी सांगितले. कुमार म्हणाले, 'आम्ही जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे की, अल्पवयीन आरोपीवर प्रौढाप्रमाणे खटला चालवण्यात यावा. आम्हाला विश्वास आहे की आम्ही ते करू. यामध्ये मुलाचे वडील, पब मालकासह एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.' (हेही वाचा: Pune Hit and Run Case: पुणे अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी; मार्चपासून विनाक्रमांक धावत होती गाडी)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)