Pune Car Accident Case: कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न; परिस्थीती सावरण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप (Watch Video)
हिट अँण्ड रन केस प्रकरणी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा, उपस्थित काही नागरिकांनी पोलिसांच्या व्हॅनवर शाई फेक केली. नागरिकांनी तेथे घोषणाबाजी केल्याचेही दिसले.
Pune car accident case: पुण्यातील हिट अँण्ड रन केसची सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. पुण्यात आलिशान पोर्शे कारने (Porsche Car) दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आज बुधवारी दुपारी, आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा, उपस्थित काही नागरिकांनी पोलिसांच्या व्हॅनवर शाई फेक केली. नागरिकांनी तेथे घोषणाबाजी केल्याचेही दिसले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Advertisement
Advertisement
Advertisement