Pune Bestiality Horror: पुण्यातील चिखलीमध्ये म्हशीच्या वासरावर लैंगिक अत्याचार करताना आढळला तरुण; समोर आला धक्कादायक व्हिडिओ (Viral Video)
रामकिशन चौहान असे या आरोपीचे नाव आहे.
पुण्यातील चिखली परिसरातील एका 24 वर्षीय तरुणाला एका म्हशीच्या वासरावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. पुण्यातील एका व्यक्तीने त्याच्या म्हशीच्या वासरावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पुण्यातील चिखली येथील जाधववाडी परिसरात 18 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर दरम्यान या कथित घटना घडल्या. जेव्हा बछड्याच्या मालकाला जनावराचे पाय बांधलेले आढळले तेव्हा घडला प्रकार त्याच्या लक्षात आला. रामकिशन चौहान असे या आरोपीचे नाव आहे. स्थानिकांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याविरुद्ध कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि भारतीय दंड संहिता आणि प्राण्यांविरुद्ध क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (हेही वाचा: Dog Crushed to Death in Noida: नोएडा मध्ये स्कूल व्हॅन चालकाने जाणीवपूर्वक कुत्र्याला चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)