पुणे-बीड थेट रेल्वेगाडीचे आज उद्घाटन, मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा

पुणे आणि बीड दरम्यान दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली थेट रेल्वेगाडी 17 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

Indian Train

पुणे आणि बीड दरम्यान अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली थेट रेल्वेगाडी अखेर आज, 17 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. पुणे-बीड (11433) ही गाडी पुण्याहून रात्री 10.45 वाजता सुटणार असून, सकाळी 6.00 वाजता बीड येथे पोहोचणार आहे. तर बीड-पुणे (11434) ही गाडी बीडहून रात्री 9.30 वाजता सुटून सकाळी 5.20 वाजता पुण्यात दाखल होणार आहे.

पुणे-बीड रेल्वेगाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, नारायणडोह, नवीन आष्टी आणि अमळनेर या स्थानकांवर थांबणार आहे. 16 डब्यांची ही सेवा पुणे आणि मराठवाडा दरम्यान प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि इतर प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement