Pune Accident: पुण्यात एनडीए जवळ भीषण अपघात; भरधाव कारने धडक दिल्याने दोन तरुण अक्षरशः हवेत उडाले, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)
या हिट अँड रन अपघाताला जबाबदार असलेल्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Pune Accident: काल रात्री पुणे-बाहुली मार्गावर कोंढवे गेट एनडीएजवळ एक भीषण अपघात झाला. यामध्ये भरधाव कारने दोन जणांना जोरात धडक दिली आहे. या अपघातामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री साधारण 9.48 च्या सुमारास या कारने पादचाऱ्यांना जोरात धडक दिली यामुळे दोन्ही तरुण अक्षरशः हवेत उडाले. घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या हिट अँड रन अपघाताला जबाबदार असलेल्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी सकाळी (दि.2) भोसरी येथील स्वीटहोम चौकात दुचाकी आणि डंपर यांच्यात अपघात झाला. या अपघातात तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित वाहन चालकांवर गुन्हा दाखल करुन एका डंपर चालकाला अटक केली आहे.
(हेही वाचा: Nashik Accident : नाशिकमध्ये भरधाव बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)