Protest Against NEET Irregularities: नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ AAP उद्या दिल्लीत, तर 19 जूनला देशभरात करणार आंदोलन

लाखो मुलांच्या मेहनतीवर आणि स्वप्नांबाबत केंद्र सरकारचा असा घोटाळा देश खपवून घेणार नाही.

नीट । Representative Image

Protest Against NEET Irregularities: आम आदमी पार्टी (AAP) बुधवारी (19 जून) नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात देशभरात निदर्शने करणार आहे. त्याचवेळी मंगळवारी दिल्लीतील जंतरमंतरवर पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. 'आप'चे राज्यसभा सदस्य संदीप पाठक यांनी सोमवारी सोशल साइट एक्सवर ही माहिती दिली. संदीप पाठक म्हणाले की, नीट परीक्षेत अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. लाखो मुलांच्या मेहनतीवर आणि स्वप्नांबाबत केंद्र सरकारचा असा घोटाळा देश खपवून घेणार नाही. या घोटाळ्याविरोधात 'आप' देशभरात आंदोलन करणार आहे.

त्यांनी सांगितले की, 18 जून रोजी सकाळी 10 वाजता आम आदमी पक्षाचे सर्व खासदार, आमदार आणि नगरसेवक जंतरमंतरवर सरकारविरोधात निदर्शने करतील. 19 जून रोजी आम आदमी पार्टी देशभरातील सर्व राज्यांमध्ये मोदी सरकारविरोधात निदर्शने करणार आहे. (हेही वाचा: NEET-UG Result 2024 Controversy: सुप्रीम कोर्टाची राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेसंदर्भात केंद्राला नोटीस; 8 जुलैला होणार पुढील सुनावणी)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)