Maharashtra Police Recruitment 2022: पोलीस भरती उमेदवारांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी; अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 15 दिवस मुदतवाढ देण्यात यावी, धनंजय मुंडे यांची मागणी

पोलिस भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक उमेदवारांनी यासंदर्भात सोशल मीडियावर तक्रार केली आहे. याशिवाय राष्ट्रावादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनीदेखील शिंदे सरकारकडे उमेदवारांना किमान 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Police Recruitment 2022: महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, अर्ज करण्याची वेबसाईट सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन असणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत असून, अजूनही अनेकांचे अर्ज करणे रखडले आहे. नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्र व अकाही कागदपत्रांत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे आधीही उमेदवारांचा बराच वेळ वाया गेला, त्यामुळे भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना किमान 15 दिवस मुदतवाढ देण्यात यावी तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. (हेही वाचा - Mumbai Railway Police Recruitment 2022: मुंबई रेल्वे पोलीस विभागात मेगाभरती; जाणून घ्या पदांची नावे, पात्रता व इतर तपशीत)

धनंजय मुंडे ट्विटर -

पोलिस भरती उमेदवारांनी सोशल मीडियावर तांत्रिक अडचणीसंदर्भात केली तक्रार - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now