PMC WhatsApp Chatbot: विविध सेवांसाठी पुणे महापालिकेने सुरु केले व्हॉट्सॲप चॅटबॉट; जाणून घ्या कसा घ्याल लाभ
नागरिकांच्या सेवा सुविधा सुखकर होण्यासाठी पुणे मनपाने हा व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरु केला आहे. या सेवा मिळवण्यासाठी 8888251001 या फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले गेले आहे.
पुणे महानगरपालिकेने (PMC) मेसेजिंग प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअॅपवर एक चॅटबॉट सुरू केला आहे. या व्हॉट्सअॅप बॉटमुळे नागरिकांना एनओसी प्रमाणपत्रे, विविध परवानग्या, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे, तक्रारी नोंदवणे यासारख्या विविध सेवा आणि माहिती मिळू शकेल. अशाप्रकारे नागरिकांच्या सेवा सुविधा सुखकर होण्यासाठी पुणे मनपाने हा व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरु केला आहे. या सेवा मिळवण्यासाठी 8888251001 या फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले गेले आहे. यावर 7 सप्टेंबर 2022 रोजी आयकर विभागाच्या सेवा उपलब्ध करून दिल्या. पीएमसी व्हॉट्सअॅप बॉटद्वारे 19 विभागांकडून सेवा प्रदान करून या उपक्रमाचा विस्तार करत आहे.
कसा घ्याल लाभ?
या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना 8888251001 या व्हॉट्सअॅपवर 'हाय' असा मेसेज करावा लागले. त्यानंतर बॉट एक मेनू प्रदान करतो, नागरिक आपल्या इच्छेनुसार माहिती किंवा सेवा निवडू शकतात. हा बॉट 24×7 मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)