PM Modi vs INDI Alliance: नंदूरबारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर पुन्हा हल्ला; 'फेक शिवसेना मला जीवंत गाडण्याची भाषा करते'

आज नंदूरबार मध्ये बोलताना ठाकरे गटाचा उल्लेख पुन्हा 'नकली शिवसेना' करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

PM Modi In Maharashtra | Twitter

लोकसभा निवडणूकीचा प्रचार जसा वाढत आहे तसा सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांचा संघर्ष देखील प्रखर होत आहे. आज नंदूरबार मध्ये बोलताना ठाकरे गटाचा उल्लेख पुन्हा 'नकली शिवसेना' करत त्यांनी एकीकडे 'मोदी तेरी कबर खुदेगी' म्हणणारी काँग्रेस आहे आणि दुसऱ्या बाजूला मला जिवंत गाडण्याची भाषा करणारी ही खोटी शिवसेना आहे. मला शिवीगाळ करतानाही ते तुष्टीकरणाची पूर्ण काळजी घेतात,' असं म्हटलं आहे. 'ते मला गाडण्याबद्दल बोलत आहेत पण त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. देशातील महिला आणि भगिनी माझे संरक्षण कवच आहेत. जिवंत असताना काय ते मला मृत्यूनंतरही जमिनीत गाडू शकणार नाहीत.' असं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif