Pink E Rickshaw Scheme: महिलांना दिलासा! ई-पिंक रिक्षा योजनेचा होणार विस्तार; प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून दिली जाणार 500 वाहने

गुलाबी रिक्षा या भारतातील काही शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय आहे. रिक्षातून प्रवास करताना महिलांचा छळ आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे.

Pink Rickshaw (संग्रहित संपादित प्रतिमा)

Pink E Rickshaw Scheme: उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला विधानसभेत सविस्तर उत्तर दिले. यावेळी त्यांनी महिला स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात 500 ई-रिक्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी 10 हजार ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेची घोषणा केली आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार या योजनेचा विस्तार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला व बालकल्याणासाठी राखीव 3 टक्के निधीतून जिल्हा व तालुका स्तरापर्यंत करण्यात येईल. यामधून प्रत्येक जिल्ह्यात 500 पिंक ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्यात येतील.

गुलाबी रिक्षा या भारतातील काही शहरांमध्ये महिला प्रवाशांसाठी सामान्य ऑटो रिक्षाला पर्याय आहे. रिक्षातून प्रवास करताना महिलांचा छळ आणि गैरवर्तन होऊ नये यासाठी भारत सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणे आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम यासारखी विशेष फीचर्स यामध्ये बसविण्यात आली आहेत. गुलाबी रिक्षा एकतर पूर्णपणे गुलाबी रिक्षा असतात किंवा त्यांचे छत गुलाबी रंगाचे असते. (हेही वाचा: Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेद्वारे पात्र महिलांना मिळणार वर्षाला 18 हजारांची आर्थिक मदत; सरकारकडून 7 महत्त्वपूर्ण बदल, घ्या जाणून)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement