'शिवसेनेच्या जाहिरातीमधून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब, राजकीय कारकिर्दीत अशी जाहिरात पाहिली नाही'- Ajit Pawar
आपल्या राजकीय जीवनात आजपर्यंत अशी जाहिरात पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहिरातीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आपल्या राजकीय जीवनात आजपर्यंत अशी जाहिरात पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, ‘माझ्या राजकीय जीवनात मी आजपर्यंत अशा प्रकारची जाहिरात पाहिली नाही, जी आजच्या वर्तमानपत्रात पाहिली. जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो होता. ते (शिवसेना) म्हणतात की, ते बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहेत, परंतु बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेच फोटो जाहिरातीतून गायब होते. शिवसेनेने जारी केलेल्या या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' असे शीर्षक दिले आहे. (हेही वाचा: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर, मुख्यमंत्री पद कळीचा मुद्दा; भाजपला धक्का)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)