Pahalgam Terror Attack: 'जर पंतप्रधान मोदींनी मला बंदूक दिली, तर मी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना मारण्यास तयार आहे'- Abhijit Bichukale (Video)

बिचुकले म्हणतात, ‘मी देशासाठी मरायला तयार आहे. माझ्या भारतीय बंधू-भगिनींवर हल्ला झाल्यानंतर मी गप्प बसू शकत नाही.'

Abhijit Bichukale | (Photo Credits: Facebook)

आपल्या विचित्र विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पुन्हा एकदा अशाच विधानांमुळे लक्ष वेधून घेतले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक धाडसी विनंती केली आहे. त्यांनी पीएम मोदींकडे बंदूक देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून ते स्वतः सीमा ओलांडून पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना संपवू शकतील. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बिचुकले म्हणतात, ‘मी देशासाठी मरायला तयार आहे. माझ्या भारतीय बंधू-भगिनींवर हल्ला झाल्यानंतर मी गप्प बसू शकत नाही. मी पंतप्रधान मोदींना दहशतवाद्यांना संपवण्याची विनंती करतो. मी त्यांना विनंती करतो की, त्यांनी मला बंदूक द्यावी जेणेकरून मी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांना मारू शकेन.’

ते पुढे म्हणतात, ‘मी आत्ता पाकिस्तानमध्ये जातो. या देशासाठी मारायचे असेल तर मी तयार आहे. माझ्या भारतीय बांधवांवर हल्ला झाल्यानंतर मी गप्प बसणार नाही. मोदींनी मला बंदूक द्यावी, मी दहशतवाद्यांच्या समोर जाऊन त्यांना गोळ्या घालेन जर ते गोळ्या घालत असतील, तर आम्हीही गोळ्या घालण्यास तयार आहे. माझी पीएम मोदींना विनंती आहे की, पाकिस्तानला पूर्णतः संपवून टाका.’ (हेही वाचा: Pahalgam Terror Attack: पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे Air India, IndiGo च्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम; निवेदन जारी, दिली प्रवासाचे पुनर्नियोजन आणि परताव्याची सुविधा)

Pahalgam Terror Attack:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement