Mahalaxmi Race Course Theme Park: मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सचे थीम पार्कमध्ये रूपांतर करण्यास विरोध; मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली बांधकामाला आव्हान देणारी याचिका

न्यायालय 24 जानेवारी 2024 रोजी पक्षकारांची सुनावणी करेल. न्यायालयाने म्हटले आहे की, बुधवारपर्यंत (जेव्हा या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल) पक्षांपैकी कोणीही या प्रकरणात कोणतीही कारवाई करणार नाही.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

Mahalaxmi Race Course Theme Park: मुंबईतील (Mumbai) एका रहिवाशाने महालक्ष्मी रेसकोर्स (Mahalaxmi Race Course) मध्ये थीम पार्क (Theme Park) च्या बांधकामाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल केली आहे. न्यायालय 24 जानेवारी 2024 रोजी पक्षकारांची सुनावणी करेल. न्यायालयाने म्हटलं आहे की, बुधवारपर्यंत (जेव्हा या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल) पक्षांपैकी कोणीही या प्रकरणात कोणतीही कारवाई करणार नाही. मुंबईचे रहिवासी तनुज भाटिया यांनी 13 जानेवारी रोजी Change.org वर याचिका सुरू केली आहे. या याचिकेवर आतापर्यंत 24,029 सह्या मिळाल्या आहेत. यावरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागी थीम पार्क आणि मुंबई आय बांधण्याच्या प्रस्तावाला किती व्यापक विरोध केला जात आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now