पार पडली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक; अध्यक्ष शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना 'हे' निर्देश

कार्याध्यक्ष राखी जाधव आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांना निवडणुकीचा आराखडा तयार करावा अशी सूचना त्यांनी केली.

अध्यक्ष शरद पवार (संग्रहित संपादित प्रतिमा)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची आणि मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक अनुक्रमे काल आणि आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘यापुढे संघटना वाढवून ती बळकट करायचे व शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन त्याची प्रतिष्ठा कशी राखली जाईल, हा प्रयत्न करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.’

‘मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. या निवडणुकीत वरिष्ठ नेते वेळ देतीलच, तसेच मी देखील वेळ देईन. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मला कुठल्या वॉर्डमध्ये न्यायचे हे ठरवावे, त्याठिकाणी यायला मी तयार आहे’, असेही पवार यांनी सांगितले.

कार्याध्यक्ष राखी जाधव आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांना निवडणुकीचा आराखडा तयार करावा अशी सूचना त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेमध्ये यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला आपला झेंडा फडकाविण्याची संधी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

@JadhavRakhee pic.twitter.com/fkKwc9m9gI

— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 13, 2022

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement